पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात कमी अनुभव असलेला बॅटसमन अजहर अलीला, पाकिस्तान वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन घोषित केला आहे. मिसबाहने निवृत्ती घेतल्यानंतर अजहर अली पाकिस्तानचा कॅप्टन होणार आहे. 

Updated: Apr 2, 2015, 09:28 PM IST
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा धक्कादायक निर्णय title=

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात कमी अनुभव असलेला बॅटसमन अजहर अलीला, पाकिस्तान वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन घोषित केला आहे. मिसबाहने निवृत्ती घेतल्यानंतर अजहर अली पाकिस्तानचा कॅप्टन होणार आहे. 

अजहर अली हा ३० वर्षाचा आहे, २०१० पासून आतापर्यंत त्याने १४ सामने खेळले आहेत, त्याला मोहम्मद हफीज, फवाद आलम, सरफराज अहमद, शोएब मकसूद आणि अनुभवी यूनुस खान असतांनाही कॅप्टन पद देण्यात आलं आहे.

अजहरचं नाव पाकिस्तानच्या वर्ल्डकप टीममध्येही नव्हतं म्हणून त्याची निवड झाली असल्याचं सांगण्यात येत आहे, त्याने आतापर्यंत ३९ टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत, शाहीद आफ्रिदी हा टी २० चा कॅप्टन असेल, तर अजहर अली हा व्हाईस कॅप्टन असणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.