व्हिडिओ : 'धर्मपरिवर्तना'साठी उकसवणारा शहजाद कॅमेऱ्यात कैद

पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद मोठ्या वादात सापडलाय. श्रीलंकेचा क्रिकेटर तिलकरत्ने दिलशान याला धर्म परिवर्तनासाठी उकसवण्याचा त्याच्यावर आरोप होतोय. महत्त्वाचं म्हणजे, ‘धर्म परिवर्तना’बद्दल दिलशानशी बोलताना शहजाद कॅमेऱ्यात कैद झालाय.  

Updated: Sep 4, 2014, 10:54 AM IST
व्हिडिओ : 'धर्मपरिवर्तना'साठी उकसवणारा शहजाद कॅमेऱ्यात कैद title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद मोठ्या वादात सापडलाय. श्रीलंकेचा क्रिकेटर तिलकरत्ने दिलशान याला धर्म परिवर्तनासाठी उकसवण्याचा त्याच्यावर आरोप होतोय. महत्त्वाचं म्हणजे, ‘धर्म परिवर्तना’बद्दल दिलशानशी बोलताना शहजाद कॅमेऱ्यात कैद झालाय.  

या व्हिडिओमध्ये शहजाद दिलशानला म्हणतोय, ‘जर तुम्ही गैर-मुस्लिम असाल आणि तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारला तरी काही फरक पडत नाही की तुम्ही तुमच्या जीवनात काय केलंय... तुम्ही सरळ ‘जन्नत’मध्ये पोहचता...’

श्रीलंकेच्या दाम्बुलाच्या ड्रेसिंग रुमकडे परत जाताना शहजाद आणि दिलशानचा हा संवाद कॅमेऱ्यात कैद झालाय. मात्र, यावर दिलशानचं उत्तर काय होतं, हे मात्र समजू शकलेलं नाही. 

विशेष म्हणजे, दिलशाननं या प्रकरणाबाबत कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या प्रकरणात अधिक चौकशी करत आहे. बोर्डाचे मीडिया महाप्रबंधक आगा अकबर यांनी बुधवारी लाहोरस्थित पीसीबी मुख्यालयात शहजादची चौकशी केली.  

तिलकरत्ने दिलशान आणि धर्म
तिलकरत्ने दिलशान याचे वडिल मुस्लीम होते तर त्याची आई बौद्ध धर्माची अनुयायी होती. दिलशान याचं अगोदर नाव होतं ‘तुवान मोहम्मद दिलशान’...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झाल्यानंतर 1999 मध्ये दिलशाननं आपलं नाव तिलकरत्ने दिलशान असं ठेवलं. मुस्लिम पित्याची संतती असूनही दिलशान आणि त्याचे भाऊ-बहिण बौद्ध धर्माचंच अनुकरण करतात. 

व्हिडिओ पाहा : काय म्हणतोय अहमद शहजाद
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.