RECORD: १७० शतक आणि ५७,६११ धावा, याला म्हणतात दैवी कामगिरी

 पेट्सी हेन्ड्रेन, हे नाव तुमच्यासाठी अगदी नव आणि अनोळखी असू शकेल. पण क्रिकेटच्या जगात या खेळाडूला ओळखीची गरज नाही. या खेळाडूने इंटरनॅशनल सामने खेळताना इंग्लडकडून केवळ ५० सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ४७.६३च्या सरासरीने ३५२५ धावा केल्या आहेत. 

Updated: Dec 15, 2014, 07:27 PM IST
RECORD: १७० शतक आणि ५७,६११ धावा, याला म्हणतात दैवी कामगिरी title=

मुंबई :  पेट्सी हेन्ड्रेन, हे नाव तुमच्यासाठी अगदी नव आणि अनोळखी असू शकेल. पण क्रिकेटच्या जगात या खेळाडूला ओळखीची गरज नाही. या खेळाडूने इंटरनॅशनल सामने खेळताना इंग्लडकडून केवळ ५० सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी ४७.६३च्या सरासरीने ३५२५ धावा केल्या आहेत. 

पण खरा धमाका या खेळाडूने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केला आहे. हेन्ड्रेन यांनी या वर्षी १९०७मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 

उजव्या हाताच्या या खेळाडूने ८३३ सामन्यात ५०.८० च्या सरासरीने ५७,६११ धावा केल्या आहेत. या जॅक हॉब्स आणि फ्रँक वुलीनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

या कामगिरीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धावांसोबत या दिग्गज खेळाडूने १७० शतक आणि २७२ अर्धशतक केले आहेत. शतकांच्या बाबतीत हेन्डेन हे हॉब्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.