नवी दिल्ली : भारतीय टेस्ट टीमचा फलंदाज चेतेश्वर पुजारा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘हॅन्डल द बॉल’ने आउट होणारा दुसरा भारतीय क्रिकेटर झाला आहे. डर्बीशायर यांच्याकडून काउंटी मॅचमध्ये लीस्टरशायरच्या विरुद्ध खेळत असताना. मॅचच्या पहिल्या दिवशी पुजारा जेव्हा 6 रनवर असताना त्याच्याकडून एक चूक झाली.
मॅचचे २० ओवरमध्ये लीस्टरशायरचा लेफ्ट आर्म मिडिअम पेसर गोलंदाज आतिफ शेखने टाकलेला चेंडू विकेटकडे जाण्यापासून रोखताना हाताचा वापर प्रयत्न करत होता.
मोहिंदर अमरनाथनंतर पुजारा हा 'हॅन्डल द बॉल' आउट होणारा भारतातील दुसरा फलंदाज झाला आहे. अमरनाथ १९८६मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध वनडे मॅचमध्ये 'हॅन्डल द बॉल' आउट होणारा पहिला भारतीय खेळाडू झाला होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पुजारा हा 'हॅन्डल द बॉल'ने आउट होणाऱ्याच्या यादीत ५९ क्रंमाकवर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.