भारताविरूद्धच्या मालिकेत ख्रिस गेलला स्थान नाही

पायाचा स्नायूची दुखापत झाल्याने ख्रिस गेलला भारताविरूद्ध होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही. वेस्ट इंडिजच्या 15 सदस्य़ीय टीममध्ये ख्रिस गेलला स्थान देण्यात आलेलं नाही.

Updated: Sep 24, 2014, 03:15 PM IST
भारताविरूद्धच्या मालिकेत ख्रिस गेलला स्थान नाही title=

सेंट जॉन्स : पायाचा स्नायूची दुखापत झाल्याने ख्रिस गेलला भारताविरूद्ध होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत स्थान देण्यात आलेलं नाही. वेस्ट इंडिजच्या 15 सदस्य़ीय टीममध्ये ख्रिस गेलला स्थान देण्यात आलेलं नाही.

ड्वॅन ब्रावोच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज टीम कोच्चीमध्ये आठ ऑक्टोबर रोजी पहिला वन डे सामना खेळणार आहे. टीममध्ये बॅटसमन मलरॅन सॅम्युअल आणि ड्वेन स्मिथ आणि वेगवान गोलंदाज जेरोम टेलरला निवडण्यात आलं आहे. 

सॅम्युअल्स आणि स्मिथ या वर्षाच्या सुरूवातीला न्यूझीलंड विरोधातील मालिका जिंकू शकलेले नाहीत.

टीम: ड्वॅन ब्रावो (कप्टन), डॅरेन ब्रावो, जासन होल्डर, लियोन जानसन, सुनील नारायण, कीरोन पोलार्ड, दिनेश रामदीन, रवि रामपाल, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, मलरेन सॅमुअल्स, लँडल सिमंस, ड्वॅन स्मिथ आणि जेरोम टेलर.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.