रैनाच्या वाग्दत्त वधूचा फोटो सोशल मीडियावर वायरल

टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन सुरेश रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. यात सुरेश आणि त्याची वाग्दत्त वधू प्रियंका चौधरी दिसतेय. 

Updated: Mar 17, 2015, 11:08 AM IST
रैनाच्या वाग्दत्त वधूचा फोटो सोशल मीडियावर वायरल title=

मुंबई: टीम इंडियाचा विस्फोटक बॅट्समन सुरेश रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. यात सुरेश आणि त्याची वाग्दत्त वधू प्रियंका चौधरी दिसतेय. 

सुरेश रैना वर्ल्डकप २०१५ संपवून देशात परतेल तेव्हा त्याचा विवाह मेरठच्या प्रियंका सोबत ठरलाय. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या लग्नाचा मुहूर्त आहे. 

रैनाचं लग्न लखनऊमध्ये होणार आहे. त्याच्या लग्नाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे. प्रियंकाचं कुटुंब मेरठच्या सुशांत सिटी कॉलनीमध्ये राहतं. प्रियंका नेदरलँडला अॅम्सर्टडॅममध्ये एका बँकेत अधिकारी आहे. प्रियंकाला दोन भाऊ आहेत. मोठा भाऊ अभिषेक चौधरी चेन्नईत सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे तर लहान भाऊ विवेक चौधरी नोएडामध्ये सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे.  

रैनाच्या लग्नाचं निमंत्रण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना ही बातमी मीडियामध्ये येण्याच्या अगोदरच मिळाल्याचं समजतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.