रणजीत जम्मू काश्मीरचा ऐतिहासिक विजय, मुंबईला हरवलं

रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरच्या टीमनं मुंबईसारख्या 'दादा' संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील 'पक्के' खेळाडू असल्याचं दाखवून दिलंय. आज वानखेडे स्टेडियमवरील मॅचमध्ये जम्मू काश्मीरनं मुंबईचा चार विकेटनं पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 

Updated: Dec 10, 2014, 09:03 PM IST
रणजीत जम्मू काश्मीरचा ऐतिहासिक विजय, मुंबईला हरवलं title=

मुंबई: रणजी क्रिकेटमध्ये लिंबू टिंबू समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरच्या टीमनं मुंबईसारख्या 'दादा' संघाचा पराभव करत आपणही क्रिकेटमधील 'पक्के' खेळाडू असल्याचं दाखवून दिलंय. आज वानखेडे स्टेडियमवरील मॅचमध्ये जम्मू काश्मीरनं मुंबईचा चार विकेटनं पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. 

रणजी ट्रॉफीत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर हे संघ आमनेसामने होते. दुसऱ्या डावात मुंबईनं दिलेल्या २३७ रन्सचं माफक आव्हान जम्मू काश्मीरनं सहा विकेटच्या मोबदल्यात पार केलं. पहिल्या डावात शतक ठोकणाऱ्या शुभम खजूरियानं दुसऱ्या डावातही ७८ धावांची अर्धशतकी खेळी करुन जम्मू काश्मीरला विजयाच्या दिशेनं नेलं.  

जम्मू काश्मीरचा कर्णधार परवेझ रसूल (३२ धावा) आणि हरदीप सिंह (नाबाद ४४ धावा) यांनी तळाच्या फलंदाजांच्या साथीनं जम्मू काश्मीरला विजय मिळवून दिला. जम्मू काश्मीरसारख्या संघाकडून घरच्या मैदानावरच पराभूत होण्याची नामुष्की मुंबई संघावर ओढावली आहे. 

'मुंबईवर मात करणे आमच्यासाठी मोठी बाब असून गेल्या २ - ३ वर्षांमध्ये आमच्या कामगिरीचा आलेख उंचावला आहे. राष्ट्रीय स्तरावरील दिग्गज संघाशी खेळणं वेगळं असतं, असं काही जण आम्हाला नेहमी सांगायचे. आता आमच्याकडे याचंही उत्तर आहे' अशी प्रतिक्रिया विजयी संघाचा कर्णधार परवेझ रसूलनं सांगितले. 

धावफलक 

मुंबई - पहिला डाव  सर्वबाद २३६धावा, दुसरा डाव सर्वबाद २५३
 
जम्मू काश्मीर - पहिला डाव सर्वबाद २५४, दुसरा डाव ६ बाद २३७ 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.