विराटच्या आरसीबीचा अजब रेकॉर्ड

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीचा ४९ रन्सवर ऑल आऊट झाला आहे.

Updated: Apr 24, 2017, 07:09 PM IST
विराटच्या आरसीबीचा अजब रेकॉर्ड  title=

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीचा ४९ रन्सवर ऑल आऊट झाला आहे. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात कमी स्कोअर आहे. या निराशाजनक कामगिरीबरोबरच आरसीबीनं आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

आयपीएलमध्ये आता सर्वाधिक आणि सर्वात कमी स्कोअर बनवण्याचा रेकॉर्ड आरसीबीच्या नावावर आहे. मुख्य म्हणजे हे दोन्ही रेकॉर्ड २३ एप्रिल याच दिवशी झाले आहेत. २३ एप्रिल २०१३ला आरसीबीनं पुणे वॉरिअर्सविरुद्धच्या मॅचमध्ये २० ओव्हरमध्ये २६३ रन्स बनवल्या होत्या. याच मॅचमध्ये क्रिस गेलनं १७५ रन्स केल्या होत्या. टी२०मधला हा अजूनही सर्वाधिक रन्स आहेत.