मुंबई : पृथ्वी शॉ याने कमी वयात क्रिकेटच्या मैदानावर आपला जम बसवला आहे. मागील वर्षी हॅरिस शील्ड क्रिकेट टूर्नामेंट रेकॉर्डब्रेक ५४६ धावा केल्या. या डावासोबत त्याच्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. या मेहनतीचं फळ आता पृथ्वी शॉ याला मिळायला सुरूवात झाली आहे.
चौदा वर्षाचे पृथ्वी शॉ सोबत क्रिकेटचं साहित्य बनवणारी कंपनी एसजी ने ३६ लाख रूपयांची डील केली आहे.
पृथ्वीला एसजीकडून सहा वर्षांसाठी स्पॉन्सरशीप मिळेल. ही कंपनी सुनील गावस्कर, राहुल द्रविड आणि वीरेंद्र सहवाग या सारख्या क्रिकेटर्ससोबत यापूर्वी कंपनीचा करार झाला आहे.
पृथ्वी या कंपनीकडून साईन केलेले सर्वात कमी वयाचा क्रिकेटर आहे.
सचिन तेंडुलकरच्या रिटायरमेंटनंतर पृथ्वी शॉ चर्चेत आला. सचिन तेंडुलकरने हॅरिस शील्ड स्पर्धेत विनोद कांबळीसोबत १९८८ साली ६६४ धावांची भागिदारी केली होती.
एसजीचे मार्केटिंगचे डारेक्टर पारस आनंद यांनी सांगितलं की, पृथ्वीने कंपनी द्वारा तयार केलेले एक्विपमेंट वापरले आहेत, तसेच तो सर्वसाधारण कुटुंबातून असल्याने कंपनीने त्याला स्पॉन्सरशीप देण्याचा निर्णय घेतला.
आनंद हे सुद्धा म्हणाले की, पृथ्वीमध्ये टीम इंडियात खेळण्याची क्षमता आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या सोबत दीर्घकाळाचा करार केला. या स्पॉन्सरशीपनंतर पृथ्वी देखिल खूश आहे, तसेच आपण आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं पृथ्वी शॉने म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.