फलंदाजाच्या हातातून बॅट निसटली आणि...

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा दुर्घटना घडल्याचे आपण ऐकले पाहिले आहे. नुकतीच अशी एक दुर्घटना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात घडली. फलंदाजाने चेंडू टोलावतना त्याच्या हातातून बॅट निसटली आणि ती विकेटकीपरच्या तोंडांवर बसली.

Updated: Jan 19, 2017, 03:16 PM IST
फलंदाजाच्या हातातून बॅट निसटली आणि... title=

नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा दुर्घटना घडल्याचे आपण ऐकले पाहिले आहे. नुकतीच अशी एक दुर्घटना पुन्हा क्रिकेटच्या मैदानात घडली. फलंदाजाने चेंडू टोलावतना त्याच्या हातातून बॅट निसटली आणि ती विकेटकीपरच्या तोंडांवर बसली.

ऑस्ट्रेलियात ही दुर्घटना घडली. बिग बँश लीगदरम्यानच्या सामन्यात ही घटना घडली. सोमवारी एडिलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनगेड्स यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली.

मेलबर्न रेनगेड्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७१ धावा केल्या आणि एडिलेड संघासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले. परेराच्या पहिल्या चेंडूवर ब्रॅड हॉजने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न केला तेव्हाच त्याच्या हातातून बॅट निसटली आणि विकेटकीपरच्या तोंडावर जाऊन आदळली. दरम्यान नेविलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.