पुणे : घरच्या मैदानावर पुण्याने हैदराबादवर ६ विकेट्स राखून दमदार विजय मिळवलाय. या विजयात मोलाची भूमिका बजावलीये ती महेंद्र सिंग धोनीने.
धोनीने नाबाद ६१ धावा करताना संघाला विजय मिळवून दिला. एका क्षणाला हैदराबादने सामन्यावर वर्चस्व मिळवले होते. मात्र मोक्याच्या क्षणी दमदार कामगिरी करत धोनीने संघाला विजय प्राप्त करुन दिला.
राहुल त्रिपाठीनेही ४१ चेंडूत ५९ धावा तडकावल्या. विजयासाठी हैदराबादने पुण्याला १७७ धावांचे आव्हान दिले होते. पुण्याने हे आव्हान ६ विकेट्स राखत पूर्ण केले.
गेल्या काही सामन्यांमध्ये धोनीची कामगिरी साजेशी होत नाही. यावरुन त्याच्यावर टीका सुरु होती. या सामन्यातूने धोनीने त्याच्या टीकाकाराला प्रत्युत्तर दिले.