रोहित शर्मा झाला आता वरळीकर, घेतला ३० कोटींचा फ्लॅट

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आता वरळीकर झालाय. मुंबईत वरळीमध्ये त्यानं फोर बीएचके फ्लॅट घेतलाय. त्याची किंमत तब्बल ३० कोटी आहे. 

Updated: Aug 12, 2015, 12:45 PM IST
रोहित शर्मा झाला आता वरळीकर, घेतला ३० कोटींचा फ्लॅट title=

मुंबई: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आता वरळीकर झालाय. मुंबईत वरळीमध्ये त्यानं फोर बीएचके फ्लॅट घेतलाय. त्याची किंमत तब्बल ३० कोटी आहे. 

आहुजा टॉवरमध्ये २९ व्या मजल्यावर हा फ्लॅट आहे. तिथून वांद्रे-वरळी सी लिंक काही मिनीटांच्या अंतरावर आहे. ५३ मजल्यांची ही इमारत सिंगापूरच्या पामर आणि टर्नर आर्किटेक्टसनं डिझाईन केलीये.

रोहितला ट्रेनिंग आणि ट्रॅव्हलिंगच्या मुद्यावर मध्यवर्ती ठिकाणी घर हवं होतं. मनासारखा फ्लॅट मिळाल्याचं रोहितनं म्हटलंय. या इमारतीत स्नूकर रुम, योगा रुम, जीम, स्विमिंग पूल, मिनी थिअटर, स्काय कॅफे, सिगार रुम, सलून आणि स्पा अशा सुविधा आहेत.

आयपीएल ८च्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा त्याची गर्लफ्रेण्ड रितीकासोबत यावर्षी साखरपुडा झालाय. लवकरच दोघं विवाहबंधनात अडकतील आणि याच नव्या फ्लॅटमध्ये राहायला येतील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.