हेल्मेट न घातल्याबद्दल सचिनने रस्त्यावरील बाईकवाल्याला म्हटले....

 हेल्मेट न घालण्यावरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आपल्या फॅन्सना हेल्मेट घालण्याची हक्काची विनंती केली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 9, 2017, 02:27 PM IST

हैदराबाद : हेल्मेट न घालण्यावरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने, आपल्या फॅन्सना हेल्मेट घालण्याची हक्काची विनंती केली आहे. सचिन आपल्या कारमधून हैदराबादमधील उप्पल रोडवरुन जात होता. त्यावेळी काही तरुणांना त्याने बाईकवरुन विनाहेल्मेट जाताना पाहिले.

गाडीची काच खाली करुन सचिनने त्यांना जवळ बोलवून हेल्मेट घालण्याचे आवाहन केले. साक्षात क्रिकेटच्या देवाला समोर पाहून तरुणांचा आनंद गगनात मावत नव्हता, त्यांनी लगेचच सचिनसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्यावेळी 'आयुष्य अनमोल आहे, ते जपा आणि हेल्मेट घालूनच बाईक चालवा', अशा सूचना सचिनने त्या युवकांना दिल्या. सचिनने आपल्या ट्विटर हॅन्डलवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.