नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरवर टीका करून चर्चेत आला आहे.
३० एप्रिलनंतर आयपीएलच्या १३ सामने महाराष्ट्राबाहेर खेळविण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या मुद्द्याला ट्विटरवर हवा देत कांबळीने आपला जवळचा मित्र सचिन तेंडुलकरवर टीकेची झोड उठवली होती.
दुष्काळ आणि आयपीएलवर इतर कोणी नाही फक्त भारतरत्न एसआरटी (सचिन रमेश तेंडुलकर) उत्तर देऊ शकतो. असे लिहून कांबळी पुन्हा सचिनला वादात अडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
कांबळीच्या ट्विटनंतर सचिनने फॅन संतापले आणि त्यांनी कांबळीची खबर घेतली. ट्विटर युजर सौरभ महाजन म्हटला. तुझ्या सारखा मित्र असेल तर शत्रूंची गरज नाही.
bijli ka bill @neend_aa_rahi_h या नावाने ट्विटर युजरने लिहिले की, सर सचिनचे नाव घेऊन तुम्ही तुमच्या करिअरमधील दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न करताहेत.
Regarding the water crisis in Maharashtra n IPL matches to be shifted.I feel the best person to answer will be Bharat Ratna #srt
— VINOD KAMBLI (@vinodkambli349) April 14, 2016
@vinodkambli349 tumhare jaise dost ho to dushmano ki kya jarurat hai. @sambha_bhilane
— saurabh mahajan (@100r0bh) April 14, 2016
@vinodkambli349 Sir aap unka naam le leke apne career ka drought khatam karte ho, utna hi kaafi hai.
By bola h to God will answer ur prayer.— bijli ka bill (@neend_aa_rahi_h) April 14, 2016