व्हिडिओ: अक्षयला थोबाडीत मारतांना दिसली सायना नेहवाल!

नुकताच प्रचलित झालेल्या डबस्मॅश व्हिडिओ अॅपनं सामान्यांनाच नाही तर मोठमोठ्या सेलिब्रिटीजनाही मोहिनी घातलीय. सलमान सोनाक्षी नंतर आता भारताची फुलराणी सायना नेहवालच्या व्हिडिओची धूम सुरू आहे.

Updated: Jun 3, 2015, 09:00 AM IST
व्हिडिओ: अक्षयला थोबाडीत मारतांना दिसली सायना नेहवाल! title=

नवी दिल्ली: नुकताच प्रचलित झालेल्या डबस्मॅश व्हिडिओ अॅपनं सामान्यांनाच नाही तर मोठमोठ्या सेलिब्रिटीजनाही मोहिनी घातलीय. सलमान सोनाक्षी नंतर आता भारताची फुलराणी सायना नेहवालच्या व्हिडिओची धूम सुरू आहे.

सायनानं नुकताच डबस्मॅश व्हिडिओ बनवला ज्यात ती नॅशनल चॅम्पियन अक्षय देवाळकरला थोबाडीत मारतांना दिसते.

डबस्मॅशमध्ये हेरा-फेरी चित्रपटातील सिन डब केला. ज्यात अक्षय कुमार म्हणतो, "ये राजू का स्टाइल है आणि यावर उत्तर देत बाबूराव म्हणजे परेश रावल राजूच्या थोबाडीत मारून म्हणतो, ये बाबूराव का स्टाइल है".

हा व्हिडिओ यूट्यूबवर खूप हीट ठरतोय. डबस्मॅश हे अॅप सध्या खूप प्रचलित झालंय. लॉन्चिंगच्या ६ महिन्यांच्या आत हे अॅप डाऊनलोड करणाऱ्या यूजर्सची संख्या १० मिलियन झालीय. भारतीय सेलिब्रिटीज या अॅपचा खूप वापर करतांना दिसतायेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.