रेकॉर्डब्रेक : विश्व चॅम्पियनशीप फायनलमध्ये सायनाची धडक

ऑलम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हिनं आज विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारलीय. यासोबतच ती या यशापर्यंत पोहचणारी पहिलीच भारतीय ठरलीय. शिवाय, तिनं  कमीत कमी आपलं रजत पदकही निश्चित केलंय. 

Updated: Aug 15, 2015, 10:28 PM IST
रेकॉर्डब्रेक : विश्व चॅम्पियनशीप फायनलमध्ये सायनाची धडक  title=

जकार्ता : ऑलम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हिनं आज विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारलीय. यासोबतच ती या यशापर्यंत पोहचणारी पहिलीच भारतीय ठरलीय. शिवाय, तिनं  कमीत कमी आपलं रजत पदकही निश्चित केलंय. 

सायना नेहवालनं वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. सायना गोल्ड मेडल जिंकण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सायनानं सेमी फायनलच्या मुकाबल्यात इंडोनेशियाच्या लिंडावायेनी फानेत्रीचा तिनं 21-17, 21-17 नं धुव्वा उडवला. 

विश्व चॅम्पियनशीपमध्ये रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात आता सायनाची गेल्या वर्षीची चॅम्पियन आणि जगातील नंबर वन खेळाडू असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याशी पडणार आहे. 

सायनानं पहिल्यांदाच वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपची फायनल गाठली आहे. या विजयासह सायनानं देशवासियांना स्वातंत्र्यदिनी अनोखी भेट दिली. आता सायनानं फायनल जिंकत गोल्ड मेडलला गवसणी घालावी अशी तिच्या तमाम चाहत्यांची आशा असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.