सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आली आहे. सायनाने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

PTI | Updated: Aug 21, 2015, 11:17 AM IST
सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत अव्वल  title=

नवी दिल्ली : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आली आहे. सायनाने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

स्पेनच्या कॅरोलिना मरिनने जागतिक स्पर्धेत सायनाचा पराभव केला होता. त्यामुळे सायनाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली होती. दरम्यान, तिने प्रथमच जागतिक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे धडक मारली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.