सानिया मिर्झाच्या जीवनावर पुस्तक

महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थानी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कारकिर्दीवर लवकरच पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

Updated: May 6, 2016, 08:55 AM IST
सानिया मिर्झाच्या जीवनावर पुस्तक title=

मुंबई : महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थानी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाच्या कारकिर्दीवर लवकरच पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

सानिया मिर्झानं टेनिसमध्ये वुमेन्स डबल्सचं अव्वल स्थान पटकावण्याचा प्रवास कसा पूर्ण केला, या प्रवासाचं वर्णन करणारं 'एस अगेन्स्ट ऑड्स' नावाचं पुस्तक येणार आहे. येत्या जुलैमध्ये हे पुस्तक प्रकाशित केलं जाणार आहे. 

सानिया आणि तिचे वडील इमरान या दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं असल्याचं प्रकाशक हार्पर कॉलिन्स यांनी सांगितलं.