मुंबई : भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर टीम इंडियानं भारतीयांना एक खुशखबर दिलीय. भारतानं कसोटी क्रिकेटमध्ये आपला प्रथम क्रमांक पुन्हा मिळवलाय.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर २-१ असा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेची शेवटच्या सामन्यातील २८० धावांची खेळी त्यांना या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर गडगडण्यापासून वाचवण्यात अपयशी ठरली.
आता भारत ११० गुणांसह या यादीत आघाडीवर आहे, तर दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा लागतो.
पाकिस्तान चौथ्या क्रमांकावर असून इंग्लंड पाचव्या, न्यूझीलंड सहाव्या, श्रीलंका सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या, बांग्लादेश नवव्या तर झिम्बाब्वे दहाव्या क्रमांकावर आहेत.
२०११ नंतर पहिल्यांदाच भारताला या स्थानावर पोहोचण्यात यश आलंय.
BREAKING: After England's 2-1 series win v SA. India are officially No. 1 in Test Rankings https://t.co/SNq8xEqYeO pic.twitter.com/S1n40SUzXG
— ICC (@ICC) January 26, 2016