लंडन : सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस यांनी विम्बलंडनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. पण या दोघांनी एकत्र ही कामगिरी केली नसली तरी त्यांचा जोडीदार एकच आहे. स्वीस टेनिस तारका मार्टिना हिंगिस यांच्यासमेवत दोघांनी ही किमया करून दाखविली आहे.
सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस यांना प्रथम मानांकित जोडीने शुक्रवारी सेमीफायनलमध्ये एकतर्फी विजय मिळवून विम्बलंडनच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला. तर दुसरीकडे भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस यांनीही मिक्स डब्ल्समध्ये फायनल गाठली आहे.
भारतीय स्टार सानिया आणि स्विस तारका हिंगिस हिने सेमी फायनलमध्ये राकेल कोप्स जोन्स आणि अबीगेल स्पीयर्स यांना ५६ मिनिटात ६-१, ६-२ ने नमावले.
सानियाला पहिल्यांदा वुमन्स डब्ल्स ग्रँडस्लॅम खिताब जिंकण्याची संधी आहे. ती पहिल्यांदा विम्बलंडनच्या फायनलमध्ये पोहचली आहे. यापूर्वी ती २०११मध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाली होती. तर हिंगिस दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. यापूर्वी ती १९९८मध्ये विम्बलंडनच्या फायनलमध्ये पोहचली होती.
तर दुसरीकडे भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगिस यांनीही मिक्स डब्ल्समध्ये फायनल गाठली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.