बंगळुरुचा पराभव करणाऱ्या डिकॉकचं वॉटसनने केलं कौतूक

आयपीएलच्या ९ व्या सीजनमध्ये रविवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात बंगळुरुचं पारडं जड वाटत होतं पण मोठी-मोठी नावं असलेल्या संघाला मात्र काल पराभवाचा सामना करावा लागला.

Updated: Apr 18, 2016, 12:41 PM IST
बंगळुरुचा पराभव करणाऱ्या डिकॉकचं वॉटसनने केलं कौतूक title=

मुंबई : आयपीएलच्या ९ व्या सीजनमध्ये रविवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यातील सामन्यात बंगळुरुचं पारडं जड वाटत होतं पण मोठी-मोठी नावं असलेल्या संघाला मात्र काल पराभवाचा सामना करावा लागला.

दिल्ली डेअरडेविल्सच्या शतकीय खेळीमुळे बंगळुरुला मोठा पराभव स्विकारावा लागला. दिल्ली संघाला हलक्यात घेणाऱ्या बंगळुरुला काल डिकॉकने चांगलाच झक्का दिला.

डिकॉकने ५० बॉल्समध्ये १०८ रन्सची तुफानी आणि संयमी खेळी केली यामुळेच शेवटी जेव्हा डिकॉक आऊट झाला तेव्हा त्याची विकेट घेणाऱ्या वॉटसनने ही त्याचं कौतूक केलं. यातूनच काल एका खेळ भावनेचं दर्शन झालं. 

पाहा व्हिडिओ