पी.व्ही सिंधूचा फायनलमध्ये पराभव, सिल्व्हरवर मानावं लागलं समाधान

 रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या गोल्ड मेडल मॅचमध्ये भारताच्या पीव्ही सिंधू हिला स्पेनच्या कॅरोलिना मारीन पराभव करत गोल्ड मेडल पकावले. 

Updated: Aug 19, 2016, 11:05 PM IST
पी.व्ही सिंधूचा फायनलमध्ये पराभव, सिल्व्हरवर मानावं लागलं समाधान  title=

रिओ :  रिओ ऑलिम्पिकच्या महिला एकेरी बॅडमिंटनच्या गोल्ड मेडल मॅचमध्ये भारताच्या पीव्ही सिंधू हिला स्पेनच्या कॅरोलिना मारीन पराभव करत गोल्ड मेडल पकावले. 

पी व्ही सिंधूला मारीनने २१-१९, १२-२१, १५-२१ने नमवत गोल्ड मेडल आपल्या नावावर केले. 

पहिल्या गेममध्ये अटीतटीची लढत होऊन सिंधूने २१-१९ जिंकला. या गेममध्ये दोघींनी एकमेकांना झुंजवले. अखेरच्या क्षणी सिंधूने गेम उंचावत गेम आपल्या नावावर केला. 

दुसऱ्या गेममध्ये सिंधूची लय बिघडली. कॅरोलिना मारीनने सुरूवातीलाच आघाडी घेतली. ती आघाडी कायम ठेवत तीने गेम २१-१२ ने आपल्या खिशात टाकला. 

तिसऱ्या गेममध्ये सामना १०-१० असा बरोबरीत झाला होता. पण नंतर मारीनने आपल्या खेळ उंचावत  गोल्ड मेडल २१-१५ ने आपल्या नावावर केले. 

भारताचं महिलेकडून पहिलं सिल्व्हर मेडल 

भारताचे वैयक्तिक प्रकारात महिलेकडून पहिले सिल्व्हर मेडल आहे. भारताकडून पहिले वैयक्तीक गोल्ड मेडल शुटर अभिनव बिंद्राने मिळवले आहे. त्यानंतर राजवर्धन राठोड यांनी शुटिंगमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलं होतं. आता पी व्ही सिंधूचा क्रमांक लागला.

सिंधूचे पहिले ऑलिम्पिक 

सिंधू ही २१ वर्षीय खेळाडू आपले पहिले ऑलिम्पिक खेळत असून तिने पहिल्या ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल मिळविले आहे.