नवी दिल्ली: जिथं वर्ल्डकपमुळे संपूर्ण जग विविध रंगांमध्ये न्हाली आहे. तिथं भारतीय फॅन्सचं काय सांगायचं. २६ मार्चला होणाऱ्या सेमीफायनलमध्ये भारताच्या विजयाची आतूरतेने वाट पाहत आहेत. सोबतच मॅचची वाट पाहत आहेत बामनौला गावातील रहिवासी.
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन सुरेश रैना या गावाचा जावई होतोय. गावातील पंचायतीनं टीम इंडियाच्या सेमीफायनलच्या दिवशी कुणीही कामावर जाणार नाही. त्यादिवशी सर्वजण मॅच बघून टीम इंडिया आणि जावयाची बॅटिंग बघणार आहेत. टीम इंडियाला चिअर करणार आहे.
गावातील पंचायतीनं सांगितलं की, गावातील प्रत्येक व्यक्ती टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. बामनौली गावाची मुलगी प्रियंका चौधरीचं लग्न ३ एप्रिलला क्रिकेटपटू सुरेश रैनासोबत आहे. शनिवारी गावातील प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली पंचायत झाली. २६ मार्चला भारत वि. ऑस्ट्रेलिया सेमीफायनल मॅच होणार आहे. यात सुरेश रैना सुद्धा खेळेल. पंचायतीनं गावात मोठी स्क्रीन लावून सर्वजण एकत्र मॅच बघण्याचं ठरवलंय.
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार सुरेश रैना नेदरलँडमधील बँक अधिकारी प्रियंका चौधरीसोबत विवाहबद्ध होणार आहे. लग्नापूर्वी प्रियंकानं आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. लग्नासाठी खूप कमी दिवस उरलेत. त्यामुळं दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.