अजब-गजब : ३१ धावांवर ऑल आऊट, तरीही जिंकला सामना!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून प्रसिद्ध आहे... पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली श्रीलंकेतील एका मॅच दरम्यान आलीय. श्रीलंकेच्या एका नामांकित क्रिकेट क्लबने लाजिरवाण्या स्कोअरवर ऑल आऊट होऊनसुद्धा, ४ रन्सनी सामना जिंकलाय.

Updated: Apr 17, 2015, 07:36 PM IST
अजब-गजब : ३१ धावांवर ऑल आऊट, तरीही जिंकला सामना!

कोलंबो : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून प्रसिद्ध आहे... पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली श्रीलंकेतील एका मॅच दरम्यान आलीय. श्रीलंकेच्या एका नामांकित क्रिकेट क्लबने लाजिरवाण्या स्कोअरवर ऑल आऊट होऊनसुद्धा, ४ रन्सनी सामना जिंकलाय.

श्रीलंकेच्या एअरफोर्स स्पोर्ट क्लब आणि गॉल क्रिकेट क्लबमध्ये हा सामना झाला होता. सामन्यात पराभूत होणारी टीम चॅम्पियनशिप मधून बाहेर पडणार होती. पहिल्यांदा बॅटिंग करणारी गॉल टीम १५.१ ओव्हरमध्ये केवळ ३१ धावा करण्यात यशस्वी झाली.

त्यानंतर बॅटिंगला आलेल्या एअरफोर्स टीम २१५ धावा करत १८४ धावांनी पुढे होती. त्यामुळे एअरफोर्स टीमचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, सामन्याला तेव्हा वेगळं वळण मिळालं जेव्हा गॉल टीमनं १८४ धावांची आघाडी केवळ २ विकेट्स गमावून मोडीत काढली. त्यानंतर चरित असलंका या खेळाडूच्या शतकी खेळीच्या जोरावर एअरफोर्स टीमसमोर ११२ धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना एअरफोर्स टीम फक्त १०७ धावा करू शकली आणि गॉल टीमने हा सामना ४ रन्सने जिंकला.

एखाद्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये एवढ्या कमी धावा करूनसुद्धा विजय मिळवणं ही गोष्ट १९२४ नंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिल्यांदाच घडलीय.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x