CSK : ड्यू प्लेसीचे त्रिशतक चेन्नईचे २० ओव्हर्समध्ये ४८३ धावा

हो तुम्हांला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, पण हा चेन्नई सुपर किंग्जचा स्कोअरकार्ड आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४८३ धावांचा डोंगर उभारला आहे. याता फाफ ड्यु प्लेसी यांने धडाकेबाज त्रिशतक लगावले आहे. केवळ ७४ चेंडूमध्ये यात ड्यु प्लेसीने एकूण ४४ षटकार लगावले.

Updated: Apr 17, 2015, 04:29 PM IST
 CSK : ड्यू प्लेसीचे त्रिशतक चेन्नईचे २० ओव्हर्समध्ये ४८३ धावा title=

मुंबई : हो तुम्हांला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, पण हा चेन्नई सुपर किंग्जचा स्कोअरकार्ड आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४८३ धावांचा डोंगर उभारला आहे. याता फाफ ड्यु प्लेसी यांने धडाकेबाज त्रिशतक लगावले आहे. केवळ ७४ चेंडूमध्ये यात ड्यु प्लेसीने एकूण ४४ षटकार लगावले.

पण लवकरच या स्कोअरकार्डचे वास्तव तुम्हांला सांगतो.... हा स्कोअरकार्ड चेन्नई सुपर किंग्जच्या कोणत्याही सामन्याचे नाही तर बॅटल ऑफ चेपॉक नावाच्या एका व्हिडिओ गेमचा आहे. 

हा स्कोअरकार्ड स्वतः चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ऑफिशयल फेसबूक पेजवर शेअर केले आहे. आणि म्हटले आहे की आज खऱ्या मॅचपूर्वी या व्हिडिओ गेमवर हात साफ करू या... हा मोठा स्कोअर बॅटल ऑफ चेपॉक नावाच्या व्हिडिओ गेमवर चेन्नईचा सुपर फॅन रेजी सॅम्युअल्सने केला आहे. 

त्यामुळे हा खरा स्कोअर नाही तर व्हिडिओ गेमचा स्कोअर आहे.... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.