सुरेश रैना याने केलं कन्हैया कुमारचं समर्थन

सध्या देशात जेएनयु प्रकरण चांगलंच गाजतंय. यावरून राजकीय पक्ष देखील राजकारण करायला पाहतायंत. जेएनयु विवादावर रोज कोणीतरी वक्तव्य करतंय.

Updated: Mar 5, 2016, 09:33 PM IST
सुरेश रैना याने केलं कन्हैया कुमारचं समर्थन title=

नवी दिल्ली : सध्या देशात जेएनयु प्रकरण चांगलंच गाजतंय. यावरून राजकीय पक्ष देखील राजकारण करायला पाहतायंत. जेएनयु विवादावर रोज कोणीतरी वक्तव्य करतंय.

तुरूंगातून बाहेर आल्यानंतर जेएनयु विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. कन्हैय्याला देशभरातून अनेक जण समर्थन देतायंत तर अनेक जण त्याचा विरोध ही करतायंत. भाजपचे नेते व अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी कन्हैय्या कुमारचे स्वागत केल्यानंतर, आता क्रिकेटपटू सुरेश रैनानेही कन्हैय्याचे समर्थन केले आहे.

कन्हैय्याचे समर्थन करताना रैनाने फेसबूक पोस्टवर कन्हैय्याला सच्चा शिपाई असे संबोधत त्याला सलाम केला आहे. एका टिव्ही चॅनलवर भाषण देतांना पाहात रैनाने म्हटले की,‘सुंदर!!! प्रत्येक शब्दात इमानदारी…त्याची इज्जत करा, खरा लढवया आणि सच्चा माणूस… तूला सलाम’

फेसबूक पोस्ट : 
Beauty!!! Can just feel the honesty in every word..Respect him, true fighter and honest man salute you