मुंबई : भारतीय टीमचा स्टार प्लेअर सुरेश रैना लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. त्याच्या लग्नाच्या लग्नपत्रिकासुद्धा छापल्या गेल्या आहेत.
सुरेश रैनाचा विवाह मेरठमधील प्रियांका चौधरीसोबत होणार आहे. येत्या ३ एप्रिलला रैना आणि प्रियांकाचा विवाह होणार आहे. त्यांच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास सुरूवातही झाली आहे.
रैनाची होणारी बायको प्रियांका अॅमस्टरडॅममध्ये एका बॅंकेत नोकरीला आहे. लग्नासाठी ती तेथील नोकरी सोडून मेरठमध्ये आली आहे. प्रियांकाचे वडील आणि सुरेश रैनाचे वडील यांचे मैत्रीपूर्ण संबध होते. ते मैत्रीचै संबध आता नात्यामध्ये रूपांतरीत होणार आहेत. या सोहळ्यानिमित्त दोन्ही कुटुंबामध्ये आनंदाचे वातवरण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.