मुंबई इंडियन्समध्ये मलिंगाच्या जागी आला जबरदस्त बॉलर

आईपीएल सीजन ९ मध्ये ७ पैकी ४ मॅच गमावणारी आणि संकटात असणारी मुंबई इंडियन्ससाठी हा नवा खेळाडू काही कमाल करु शकेल का यावर आता त्यांचं भविष्य ठरेल. लसिथ मलिंगा टीममधून बाहेर झाल्यानंतर टीमला मोठा धक्का बसला होता.

Updated: Apr 27, 2016, 06:56 PM IST
मुंबई इंडियन्समध्ये मलिंगाच्या जागी आला जबरदस्त बॉलर  title=

मुंबई : आईपीएल सीजन ९ मध्ये ७ पैकी ४ मॅच गमावणारी आणि संकटात असणारी मुंबई इंडियन्ससाठी हा नवा खेळाडू काही कमाल करु शकेल का यावर आता त्यांचं भविष्य ठरेल. लसिथ मलिंगा टीममधून बाहेर झाल्यानंतर टीमला मोठा धक्का बसला होता.

६२ टी-२० सामन्यांमध्ये ७२ विकेट घेणारा गोलंदाज जेरोम टेलर आता मुंबई इंडियन्स या संघात आला आहे. टेलर याआधी किंग्स इलेवन पंजाब आणि पुणे वारियर्स यांच्याकडून खेळला आहे.

२००६ मध्ये वेस्टइंडिजसाठी हॅट-ट्रिक घेणारा टेलर हा पहिला गोलंदाज होता. त्यामुळे आता टेलरच्या टीममध्ये येण्याने मुंबईला किती फायदा होतो हे पहावं लागेल.