कोलकाता : पहिल्या दोन्ही वनडे जिंकल्यानंतर रविवारी भारतीय संघ तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या वनडेमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश करण्यासाठी मैदानात उतरेल. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर ही मॅच खेळवली जाणार आहे.
इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणाऱ्या चॅम्पिअन्स ट्रॉफीआधी भारताची ही शेवटची वनडे असणार आहे, त्यामुळे या मॅचमध्ये कोहली नव्या चेहऱ्यांना संधी देणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं कोहली आणि केदार जाधवच्या सेंच्युरीच्या मदतीनं 351 रनचं लक्ष्य अगदी सहज पार केलं, तर दुसऱ्या वनडेमध्ये युवराज आणि धोनीच्या सेंच्युरीमुळे भारतानं धावांचा डोंगर उभारून 15 रननी ही मॅच जिंकली होती.