दुबई : टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान गाठलंय. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला हार पत्करावी लागल्यानंतर आफ्रिकेलच्या तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीये. इंग्लंडच्या या विजयाचा टीम इंडियाला क्रमवारीत फायदा झालाय. यापूर्वी २००९ मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल स्थान मिळवले होते.
सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारत २-० ने पिछाडीवर आहे. मात्र कसोटीत ही टीम अव्वल झालीये. जोहान्सबर्ग कसोटी सुरु होण्याआधी द. आफ्रिका ११२ गुणांसह अव्वल स्थानी होती. मात्र मालिकेतील दोन कसोटीत पराभव झाल्यानंतर आफ्रिकेचे गुण १०७ झालेत. त्यामुळे ११० गुणांसह भारताने क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावलाय. ऑस्ट्रेलिया १०९ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंडचे १०४ गुण आहेत.
यापूर्वी २००९ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. २००९ मध्ये भारताने श्रीलंकेला मुंबईतील कसोटीमध्ये हरवत पहिले स्थान मिळवले होते. दोन वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी राहिल्यानंतर २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धची मालिका गमावल्यामुळे भारताने पहिले स्थानही गमावले होते.