मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. क्रिकेट प्रेमींच्या नजरा आता आपल्या आवडत्या संघांवर टीकून आहे. भारतात जेथे क्रिकेट खेळ नाही धर्म आहे, तो प्रत्येक भारतवासियांच्या नसांत तो भिनला आहे.
आता संपूर्ण भारतीय क्रिकेट रसिकांचे लक्ष आगामी ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यावर लागून राहिले आहे. भारत सेमी फायनलला पोहचला आहे. भारताचा सामना ऑस्ट्रेलियाच्या होम पीचवर आहे. आता एक प्रश्न पुन्हा पुन्हा मनात डोकावून जातो की महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली ही टीम इंडिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप भारतात आणेल का? आता धोनीच्या संघावर संयश घेणे चुकीचे ठरणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने जे करून दाखविले ते आतापर्यंत कोणत्याही संघाने केले नाही. टीम इंडिया आतापर्यंत लागोपाठ सात सामने जिंकले आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये सलग १० सामने जिंकल्याचा पराक्रम केला आहे. आहे. त्यामुळे स्पष्ट होते की, टीम इंडिया गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये टॉप क्लास आहे.
फलंदाजीबाबत बोलायचे झाले तर भारतीय टीम इतर संघाच्या तुलनेत सरस दिसत आहे. भारतीय टीम ८५ वेळा ३०० पेक्षा अधिक धावासंख्या करण्याचा नवा विक्रम केला आहे. तसेच ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. वर्ल्ड कपमध्ये ४०० पेक्षा अधिक धावा प्रथम करण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर आहे. वन डे मध्ये सर्वाधिक वेळा ४०० धावा करण्याचा रेकॉर्ड भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहे. दोन्ही संघांनी चार वेळा हा कारनामा केला आहे. फलंदाजीच्या बाबतीत टीम इंडियाचे वाघ सर्वांच्या पुढे आहेत. ते टीमला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर काढून आणू शकतात.
गोलंदाजीबाबत बोलायचे झाले तर ही भारताची कमकुवत बाजू मानली जात होती. विशेष करून जलद गती गोलंदाजी... पण या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि उमेश यादव यांच्या त्रिकुटाने जी कमाल केली ती वाखाणण्याजोगी आहे. या त्रिकूटाने आपल्या लाइन आणि लेन्थने विरोधी टीमला नामोहरम केले. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या ट्राय सिरीजमध्ये या तिघांची कामगिरी खास नव्हती. स्पिनबद्दल बोलायचे झाले तर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांची तुलना आता वर्ल्डच्या बेस्ट स्पिनरमध्ये होत आहे. हे दोघे कोणत्याही संघावर आपले वर्चस्व ठेवण्यात यशस्वी राहतात. फिल्डिंगमध्ये सुरेश रैना, जडेजा, कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा हे फिल्डिंगमुळे विरोधी टीमला धडकी भरू शकतात.
इतिहासावर नजर टाकली असता वर्ल्ड कप २०११मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेला फायनलमध्ये ६ विकेटने पराभूत करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीमने दोनदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला पराभूत करत वर्ल्ड कप आपल्या नावावर केला होता. २००६-०७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तीन सामने गमावून वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता पकडला होता. २००३ मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीमने फायनलमध्ये धडक मारली पण ऑस्ट्रेलियाशी सामना गमावून विश्व विजेता होण्याचे स्वप्न भंगले होते. १९९९, १९९६, १९८७ मध्ये भारत सेमी फायनलमध्ये पोहचला होता. १९९२ मध्ये सेमी फायनल गाठता आली नाही.
वर्ल्ड कपच्या इतिहासात भारत आतापर्यंत तीन वेळा फायनल खेळला आहे. त्यातील दोनवेळा किताब जिंकण्यात यशस्वी झाला आहे. इतिहासाकडे पाहता भारत जेव्हाही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचला आहे. त्यापूर्वीच्या सिरीजमध्ये भारताची कामगिरी वाईट राहिली आहे. त्यामुळे आता भारतवासियांना पुन्हा वर्ल्ड कप भारताकडे येण्याचे स्वप्न पाहण्यास हरकत नाही...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.