अँटिग्वा : कॅप्टन विराट कोहलीच्या नाबाद 143 रन्सच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 302 धावा केल्या. टीम इंडियानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अडखळती झाली, मुरली विजय अवघ्या 7 रन्सकरुन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजारानं डावाची धुरा संभाळली, लंचपर्यंत दोघांनी 72 रन्स केल्या.
लंचनंतर चेतेश्वर पुजारा लगेच आऊट झाला... त्यानंतर विराट कोहलीनं वेस्ट इंडिज बॉलर्सवर हल्ला चढवला. विराट कोहली आणि शिखर धवननं तिसऱ्या विकेटीसाठी 105 रन्सची पार्टनरशिप केली.. विराट कोहलीनं टेस्ट करीअरमधली 12वी सेंच्युरी झळकावली.
तर शिखर धवन 84 रन्सवर आऊट झाला. दिवस संपला तेव्हा विराट कोहली 143 रन्स तर आर. अश्विन 22 रन्सवर खेळत होते. वेस्ट इंडिजतर्फे देवेंद्र बिशूनं 3 विकेट्स तर शॅनोन गॅब्रिएलने एक विकेट घेतली.