सिडनीतील सेमीफायनलसाठी हवाय चाहत्यांचा पाठिंबा - क्लार्क

सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे. सिडनीतील सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या समर्थकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन क्लार्कनं ट्विटरद्वारे केलं आहे. 

Updated: Mar 23, 2015, 06:47 PM IST
सिडनीतील सेमीफायनलसाठी हवाय चाहत्यांचा पाठिंबा - क्लार्क title=

सिडनी: सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कनं भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे. सिडनीतील सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या समर्थकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं, असं आवाहन क्लार्कनं ट्विटरद्वारे केलं आहे. 

सोमवारी मायकल क्लार्कनं ट्विटरवर ट्विटकरुन समर्थकांचा पाठिंबा मागितला आहे. गुरुवारी होणाऱ्या सेमी फायनलसाठी ऑस्ट्रेलियन समर्थकांनी देशाचे झेंडे आणि संघाची जर्सी घालून जास्तीत जास्त संख्येनं स्टेडियममध्ये उपस्थित राहावं, असं क्लार्कनं म्हटलं आहे. 

I call on all Australian cricket lovers to paint the SCG gold on Thursday. We need your support. #goldout

— Michael Clarke (@MClarke23) March 20, 2015

Bring your flags, shirts, hats. #goldout

— Michael Clarke (@MClarke23) March 20, 2015

सिडनी क्रिकेट मैदानात होणाऱ्या सामन्यातील ७० टक्के तिकीटं ही भारतीय संघाच्या पाठिराख्यांनी विकत घेतल्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या बहुसंख्य सामन्यांना भारतीय संघाला चांगला पाठिंबा मिळला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.