ब्रिस्बेन : स्टार भारतीय क्रिकेटर विराट कोहली क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करता करता १९ धावांनी राहून गेला आहे. ब्रिस्बेनमध्ये विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. तो रन आऊट झाला नसता तर सर्वात कमी इनिंगमध्ये ७००० धावा करणारा पहिला क्रिकेटर झाला असता.
सध्या हा रेकॉर्ड डिव्हिलअर्सच्या नावावर आहे. कोहली या विक्रमाच्या खूप जवळ आहे.
डिव्हिलिअर्सने १६६ इनिंगमध्ये ७००० धावांचा पल्ला गाठला आहे. पर्थ वन डे सामन्यात ९१ आणि ब्रिस्बेन वन डेमध्ये ५९ धावा करणाऱ्या कोहलीने १६८ सामन्यात १६० इनिंगमध्ये २३ शतक आणि ३६ अर्धशतकांसह ५०.८९ सरासरीने ६९८१ धावा बनविल्या आहेत. भारतीय फलंदाज कोहलीच्या पुढे माजी कर्णधार सौरव गांगुली आहे. त्याने ७००० धावा १७४ इनिंगमध्ये केल्या आहेत.
७००० पेक्षा अधिक वन डे धावा बनविणाऱ्यांच्या यादीत कोहली जगात ३६ व्या स्थानावर आहे. तो भारताचा आठवा खेळाडू आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर (18,426 रन), गांगुली (11,363 रन), राहुल द्रविड (10,889 रन), मोहम्मद अजहरुद्दीन (9,378 रन), महेंद्र सिंह धौनी (8,850 रन), युवराज सिंह (8,329 रन) आणि वीरेंद्र सहवाग (8,273 रन)