ब्रिस्बन: पर्थ वन डेनंतर लागोपाठ दुसरे शतक लगावणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत दोन विक्रमांची बरोबरी केली आहे.
पहिला विक्रम
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरूद्ध लागोपाठ दोन सामन्यात शतक लगावणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्माने स्थान मिळावले आहे. या पूर्वी ग्रॅम हिक आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी ही किमया केली होती.
दुसरा विक्रम
ऑस्ट्रेलिया विरूध्द पहिल्या २० वन डे सामन्यात १००० रन करणारा तो तिसरा खेळाडू झाला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांनी हा विक्रम केला होता.
तिसरा विक्रम
ब्रिस्बन क्रिकेट मैदानावर सर्वाधिक धाव संख्या करणारा रोहित शर्मा हा पहिला सलामावीर भारतीय ठरला आहे. तसेच तो त्याची १२४ धावांची खेळी सर्वोत्तम खेळी आहे.
यापूर्वी सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून सर्वाधिक ९१ धावा केल्या होत्या.
चौथा विक्रम
ब्रिस्बन क्रिकेट मैदानावर सर्वाधिक धावांची भागिदारी करणाऱ्यांचा यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी तिसरे स्थान पटाकावले आहे. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली आहे.