मेलबर्न: मेलबर्न क्रिकेट मैदानात आज सुरू असलेल्या भारत-बांग्लादेश क्वॉर्टर फायनल मॅचमध्ये दोन्ही टीमसाठी 'करो या मरो'ची स्थिती आहे. पण यादरम्यान आज अनेक रेकॉर्ड्स पण होऊ शकतात.
पाहा कोणकोणते रेकॉर्ड्स होऊ शकतात आज...
- एमसीजीच्या मैदानात रोहित शर्मा सर्वाधिक आणि चांगल्या सरासरीने रन्स बनवणारा क्रिकेटपटू बनलाय. रोहितनं 5 मॅचमध्ये 93च्या सरासरीने 280 रन्स बनवले आहेत.
- भारताची ओपनिंग जोडी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या रेकॉर्डमध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. जर रोहित आणि शिखर आणखी 1 रन आपल्या पार्टनरशिपमध्ये जोडला असता तर ही जोडी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स बनविण्याच्या या रेकॉर्डमध्ये दुसऱ्या नंबरवर येईल.
- क्रिकेट वर्ल्डकपच्या नॉक-आऊट गेममध्ये सौरव गांगुलीनंतर सेंच्युरी ठोकणारा रोहित भारताचा फक्त दुसरा क्रिकेटपटू आहे.
- आतापर्यंत भारतानं 7 मॅचमधील बॅटिंग पावर प्लेमध्ये एकही विकेट गमावली नाही. भारताऐवजी कोणत्याची टीमनं हा कारनामा केला नाहीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.