नवी दिल्ली : फुटबॉल, रग्बी आणि टी-२० क्रिकेटसारख्या खेळांना ग्लॅमर तडका देण्यात चीअरलीडर्सचा वाटा मोठा असतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का यांची कमाई किती असते. एनएफएलशी संबंधित चीअरगर्ल्सची कमाई सर्वाधिक असते. यातील प्रसिद्ध चीअरगर्ल्सना प्रतिसीझन साठ हजार ते ९० हजार इतके मिळतात.
अॅश्ले पी - डलास काऊबॉईज चिअरलीडर्स ग्रुप सर्वाधिक प्रसिद्ध आहे. वेबसाईटनुसार मॅचव्यतिरिक्त वर्षभर मॉ़डेलिंग खासकरुन स्विमसूट कॅलेंडर गर्लच्या ऑफरही त्यांना मिळतात. यात अॅश्ले पी टीमची कर्णधार आहे. तिला इतर चीअरगर्ल्सची पेक्षा जास्त पेमेंट मिळतोय. या टीमच्या चीअरलीडर्सची कमाई ६ कोटी रुपये आहे.
सिंथिया - टेंपा बे बुकानियर्सची कॅप्टन सिंथिया आहे. हिला प्रत्येक सीझनसाठी ६० हजार रुपये आणि वर्षासाठी साधारण ५ लाख रुपये पेमेंट मिळतो.
पॅट्रिसिया - पॅट्रिसिया पेशाने इन्व्हायरमेंट इंजीनियर आहे. तिला डान्सची आवड असल्याने तिने चीअरलीडर्सचा ग्रुप जॉईन केला. हिला प्रत्येक सीझनसाठी ९० हजार रुपयांपर्यंत पेमेंट मिळते. वर्षभराची तिची कमाई ८ लाख रुपयांपर्यंत असते.
लीज - टेक्सास टीमची ही सर्वात पॉप्युलर लीज टीमसोबत गेल्या ५ वर्षांपासून आहे. प्रत्येक सीझनसाठी तीला ८० हजार पेमेंट मिळतो. त्यावरुन तिला वार्षिक ७ लाख रुपयांपर्यंत वेतन मिळते.
चारो - रेडस्किन टीमची चारोला लहानपणापासून डान्सची आवड होती. तिला प्रत्येक सीझनसाठी ६० हजार रुपये मिळतात. तिला वार्षिक पेमेंट ५ लाख रुपयांपर्यंत मिळतो.
सध्या आयपीएलची क्रेझ आहे. वेबसाईटनुसार आयपीएल च्या यंदाच्या हंगामात चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी १२ हजार रुपये दिले जातात. केकेआरच्या चीअरली़डर्सना अधिक मानधन मिळते. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या चीअरलीडर्सचा नंबर लागतोय. त्यांना एका मॅचसाठी १० हजार रुपये मिळतात.