नवी दिल्ली : भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनीही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय.
बुधवारी सकाळी अर्ज दाखल केल्याची माहिती वेंकटेश प्रसाद यांनी दिली. यापूर्वी प्रसाद यांनी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
2007मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला टी-20 वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा प्रसाद गोलंदाजी प्रशिक्षक होते.
प्रशिक्षपदाच्या शर्यतीत वेंकटेश प्रसाद यांच्यासह रवी शास्त्री आणि निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील हेही आहेत.
2007 आणि 2009 या कालावधीत प्रसाद गोलंदाजीचे प्रशिक्षक होते. तसेच आयपीएलमधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेला संघ चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्याही प्रशिक्षपदी काम केलेय.