हरभजन सिंगची विकेट, ऑक्टोबरमध्ये विवाह

टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची विकेट  प्रेयसी गीता बसराने काढली आहे. तो ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ANI | Updated: Aug 22, 2015, 12:58 PM IST
हरभजन सिंगची विकेट, ऑक्टोबरमध्ये विवाह title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची विकेट  प्रेयसी गीता बसराने काढली आहे. तो ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हिंदुस्तान टाइम्सने हरभजन सिंगच्या लग्नाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हरभजन २९ ऑक्टोबरला पंजाबमधील जालंधरपासून २० किमी असलेल्या फगवाडा येथे लग्न करण्याची शक्यता आहे, असे हिंदुस्तान टाइम्सने वृत्तात सूत्रांचा अहवाला देऊन म्हटले आहे. 

भज्जी आपली प्रेयसी गीता बसरासोबत अनेक वर्षांपासून संबंधात आहे. भज्जी आणि गीता हे दोघेही विवाहाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, हरभजन आणि गीताच्या कुटुंबियांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिलाय.

भज्जी आणि गीता बसरा यांची प्रेम अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हरभजन सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तो क्रिकेट सामन्यांमध्ये खेळत आहे. तर भज्जीसाठी लकी गर्ल ठरललेल्या गीता बसरा 'द ट्रेन' या सिनेमात दिसली होती. हरभजनने पंजाबी सिनेमांमध्ये गीताला लॉन्च करण्यासाठी पैसे देखील लावले आहेत. 

भारताकडून सर्वात पहिले कसोटी हॅट्रिक करणारा भज्जी २०११ विश्वचषक विजेत्या संघात होता. मात्र, खराब फॉर्ममुळे तो सध्या भारतीय संघात नव्हता. पुन्हा त्याची टीम इंडियात निवड झाली आहे. तो सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.