आठवे आश्चर्य, विदर्भाचा अक्षय कर्णेवारची दोन्ही हातांनी गोलंदाजी

  क्रिकेटमध्ये काय कधी घडेल हे कोणी सांगू शकत नाही. असा एक करिश्मा भारताच्या स्थानिक सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पाहायला मिळाला.

Bollywood Life | Updated: Jan 19, 2016, 07:42 PM IST
आठवे आश्चर्य,  विदर्भाचा अक्षय कर्णेवारची दोन्ही हातांनी गोलंदाजी title=

मुंबई :  क्रिकेटमध्ये काय कधी घडेल हे कोणी सांगू शकत नाही. असा एक करिश्मा भारताच्या स्थानिक सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पाहायला मिळाला.

विदर्भाचा अक्षय कर्णेवार डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी गोलंदाजी करू शकतो. अक्षयचा या विशेष कौशल्य पाहून प्रतिस्पर्धी फलंदाज, अंपायर्ससह स्टेडिअममधील प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर बडोद्याविरोधात  विदर्भचा कर्णधाराने अक्षयला  १५ वे षटक टाकण्यास सांगितले. त्यावेळी अक्षयने अंपायरला सांगितले की, तो इरफानला उजव्या हाताने आणि हार्दिक पांड्याला डाव्या हाताने टाकणार आहे.
अक्षयने असे सांगितल्यावर अंपायरला धक्का बसला. पण अक्षयने लिलया दोन्ही हातांनी गोलंदाजी केली.

उजव्या हातांनी टाकलेल्या पहिल्या चेंडू इरफान सीमारेषेवर झेल बाद होता होता वाचला. फिल्डरने कॅच सोडला. अक्षयने दुसरा चेंडू डाव्या हाताने टाकला.
अशा प्रकारे त्याने दोन ओव्हरमर्ध्य १५ रन्स देऊन १ विकेट घेतली.

पाहा अक्षयच्या या किमयेचा व्हिडिओ...