गेल आणि डिव्हिलिअर्सला युवराज सिंगने दिले १० चेंडूत ५० रन्स काढण्याचे चॅलेंज

  काल क्रिस गेल याने १२ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक लगावूनन वर्ल्ड क्रिकेटमध्ये सिक्सर किंग युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे. पण गेलच्या या फटकेबाजीनंतरही युवराज खूश नाही आहे.

Updated: Jan 19, 2016, 05:11 PM IST
 गेल आणि डिव्हिलिअर्सला युवराज सिंगने दिले १० चेंडूत ५० रन्स काढण्याचे चॅलेंज title=

मुंबई :  काल क्रिस गेल याने १२ चेंडूत धडाकेबाज अर्धशतक लगावूनन वर्ल्ड क्रिकेटमध्ये सिक्सर किंग युवराज सिंग यांच्याशी बरोबरी केली आहे. पण गेलच्या या फटकेबाजीनंतरही युवराज खूश नाही आहे.

युवराजने काल रात्री गेलच्या अर्धशतकानंतर एक ट्विट केले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक बनविण्याची क्षमता केवळ दोन खेळाडूंमध्ये असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

 

आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स टीमकडून खेळणारे युवी आणि गेल हे चांगले मित्र आहेत. काल रात्री गेलच्या अर्धशतकानंतर युवराजने ट्विट केले, म्हणाला , तू १२ चेंडूत अर्धशतक केले मी खूप निराश आहे. पुढील वेळेस तू (क्रिस गेल) किंवा एबी डिव्हिलिअर्स १० चेंडूत करण्याबद्दल विचार करा.

युवराजने या ट्विटनंतर गेलने एक स्मायली टाकून ट्विटला शेअर केले.

त्यानंतर आरसीबीच्या स्पिनर यजुवेंद्र तहल या मस्करी करत एक ट्विट केले आणि युवराज, गेल आणि डिव्हिलिअर्सने टॅग करत म्हटले की, हा रेकॉर्ड  फक्त मी तोडू शकतो.

 

युवराजचे जलद अर्धशतक