अॅडिलेड : ऑस्ट्रेलिया विरूद्ध वन डे सिरीजमध्ये पराभूत झालेल्या टीम इंडियाने पहिल्या टी-२० शानदार कामगिरी केली. या सामन्यात अनेक रेकॉर्ड झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय टीमतर्फे तिसऱ्या विकेटसाठी सर्वात मोठी पार्टनशिप (१३४) धावाचा रेकॉर्ड बनविण्यात आला. विराट आणि रैना यांच्या नावावर हा विक्रम नोंदविण्यात आला. यापूर्वी युवराज सिंग आणि रैना यांनी दक्षिण आफ्रिका विरुद्ध २ मे २०१० रोजी ८८ धावांची भागीदारी केली.
कोहली-रैनाची ही भागीदारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी तिसऱ्या क्रमांकाची आहे. या लिस्टमध्ये कोहली आणि रोहित शर्मा सर्वात पुढे आहेत, त्यांनी १३८ धावांची भागिदारी केली आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध २ ऑक्टोबर २०१५ ला दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या स्थानावर वीरेंद्र सहवाग आणि गौतम गंभीर यांननी इंग्लड विरूद्ध १९ सप्टेंबर २००७ पहिल्या विकेटसाठी १३६ रन्स केले होते.
विराट कोहलीने आपल्या करिअरमधील सर्वाधिक स्कोअर केला आहे. टी -२० सामन्यात त्याने ५५ चेंडूत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ९० धावा काढल्या. त्याने आपल्या करिअरमधील १० अर्धशतक बनविले.
स्टार ऑलराउंडर सुरेश रैना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असे करणारा विराट कोहलीनंतर तो दुसरा खेळाडू आहे. विराटने ११०६ धावा केल्या आहेत. त्याने ४१ धावा काढल्याने त्याचे आता १०२४ धावा झाल्या आहेत. त्याने टी-२० मध्ये एक शतक आणि ती अर्धशतक लगावले आहेत.