विराट कोहलीला वाटतेय दिवाळखोर व्हायची भीती

सध्याचा जगातला सर्वोत्तम बॅट्समन म्हणून विराट कोहलीकडे पाहिलं जात आहे.

Updated: Jun 5, 2016, 10:30 PM IST
विराट कोहलीला वाटतेय दिवाळखोर व्हायची भीती title=

मुंबई : सध्याचा जगातला सर्वोत्तम बॅट्समन म्हणून विराट कोहलीकडे पाहिलं जात आहे. या वर्षी तर विराट कोहली हा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मग ते टी २० वर्ल्ड कप असो किंवा आयपीएल. सगळीकडेच विराटची बॅट तुफान चालली आहे. 

मैदानावरच्या या कामगिरीमुळे जाहिरातींच्या विश्वामध्येही विराट कोहली चमकत आहे. मागच्या वर्षी विराट कोहलीनं जाहिरातींच्या माध्यमातून १०० कोटी रुपये कमावले असल्याची चर्चा आहे. 

एवढे पैसे कमावल्यानंतरही विराट कोहलीला दिवाळखोर व्हायची भीती वाटत आहे. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं हे बोलून दाखवलं आहे. पैसा मला उत्तेजन देत नाही, पण तो महत्त्वाचा आहे. माझं आयुष्य सुरक्षित कसं होईल, याता मी आत्तापासूनच विचार करत आहे.  

कारकिर्दीच्या शेवटी अनेक खेळाडू दिवाळखोर झाल्याचं मी पाहिलं आहे. याची मला भीती वाटत आहे, असं कोहली म्हणाला आहे.