विराटचे नेतृत्व दमदार मात्र वैयक्तिक कामगिरी चांगली नाही

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील गेल्या वर्षात भारतीय संघाने चांगली कामगिरी केलीये. कोहलीच्या नेतृत्वाखालील तब्बल २२ वर्षांनी भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या मातीत धूळ चारली. त्यानंतर मायभूमीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला चीतपट केले.

Updated: Jan 3, 2016, 12:24 PM IST
विराटचे नेतृत्व दमदार मात्र वैयक्तिक कामगिरी चांगली नाही title=

नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील गेल्या वर्षात भारतीय संघाने चांगली कामगिरी केलीये. कोहलीच्या नेतृत्वाखालील तब्बल २२ वर्षांनी भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या मातीत धूळ चारली. त्यानंतर मायभूमीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला चीतपट केले.

एकीकडे विराट कर्णधार म्हणून दमदार कामगिरी करत असला तरी त्याची वैयक्तिक कामगिरी चांगली राहिलेली नाही. कसोटी सामन्यातील १५ डावांत कोहलीने ४२.६७च्या सरासरीने केवळ ६४० धावा केल्यात. तर २० वनडे सामन्यात ३६.६५च्या सरासरीने ६२३ धावा बनवल्यात. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्याच्याकडून असेल. 

येत्या १२ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मालिका सुरु होतेय. टी-२० विश्वचषकापूर्वीची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जातेय.