टी-20 क्रमवारीमध्ये कोहलीच अव्वल

आयसीसीनं टी-20ची क्रमवारी जाहीर केली आहे. 820 रेटिंगसह  विराट कोहली पुन्हा एकदा नंबर एकवर आहे.

Updated: Sep 10, 2016, 06:18 PM IST
टी-20 क्रमवारीमध्ये कोहलीच अव्वल  title=

दुबई : आयसीसीनं टी-20ची क्रमवारी जाहीर केली आहे. 820 रेटिंगसह  विराट कोहली पुन्हा एकदा नंबर एकवर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा ऍरोन फिंच दुसऱ्या तर ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजनंतर मॅक्सवेल 16 क्रमांकवरती आला आहे. 

टी-20च्या बॅट्समनच्या क्रमावारीतल्या टॉप 10 मध्ये फक्त कोहलीच आहे. कोहलीनंतर 612 रेटिंगसह रोहित शर्मा 18 व्या क्रमांकावर आहे. टी20 मधल्या बॉलरवर नजर टाकली तर वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री 743 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या क्रमवारीत भारताचा जसप्रित बुमराह दुसऱ्या आणि आर.अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहेत.