धोनीच्या धमाकेदार खेळीवर बोलला विराट कोहली

शनिवारी हैदराबादमध्ये महेंद्र सिंह धोनीची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. त्यामुळे पुणे सुपरजायंटने सनराइजर्स हैदराबादवर विजय मिळवला. धोनीने 34 बॉलमध्ये पांच चौकार आणि तीन सिक्सच्या मदतीने नाबाद ६१ रन केले.

Updated: Apr 23, 2017, 08:58 AM IST
धोनीच्या धमाकेदार खेळीवर बोलला विराट कोहली title=

नवी दिल्ली : शनिवारी हैदराबादमध्ये महेंद्र सिंह धोनीची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. त्यामुळे पुणे सुपरजायंटने सनराइजर्स हैदराबादवर विजय मिळवला. धोनीने 34 बॉलमध्ये पांच चौकार आणि तीन सिक्सच्या मदतीने नाबाद ६१ रन केले.

धोनीला त्याच्या या खेळीमुळे मॅन ऑफ द मॅच देखील मिळाला. धोनीच्या या खेळीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत धोनीचं कौतूक केलं आहे. कोहलीने म्हटलं आहे की, या मॅचमध्ये धोनीने ते केलं जे तो वर्षांपासून करत आला आहे. काय शानदार खेळी केली. बघून मज्जा आली.

शनिवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये धोनीने शेवटच्या बॉलवर फोर मारला आणि विजय साकारला.