'घरी भांडण होतं होतं आणि तेव्हा...'; लेक राहाविषयी बोलताना भावूक झाली आलिया भट्ट

Alia Bhatt on Daughter Raha : लेक राहाविषयीचा 'तो' किस्सा सांगताना भावूक झाली आलिया भट्ट

दिक्षा पाटील | Updated: Sep 20, 2024, 11:14 AM IST
'घरी भांडण होतं होतं आणि तेव्हा...'; लेक राहाविषयी बोलताना भावूक झाली आलिया भट्ट title=
(Photo Credit : Social Media)

Alia Bhatt on Daughter Raha : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही नेहमीच तिची लेक राहा कपूरविषयी बोलताना दिसते. अनेक मुलाखतींमध्ये आलियानं अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान, आलियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 2022 मध्ये ‘हार्ट ऑफ स्टोन’ चं शूटिंग करत होती तेव्हा पहिल्यांदा तिला राहा असण्याची जाणीव झाल्याचं सांगितलं. त्याशिवाय तिनं राहाचा पहिला शब्द कोणता होता याविषयी देखील सांगितलं आहे.

आलियानं ही मुलाखत अल्योरला दिली होती. यावेळी राहानं सांगितलं की 'मी पोर्तुगालमध्ये होते. दुसऱ्या दिवशी माझं शूट होतं म्हणून मी लवकर झोपण्याचा प्रयत्न करत होते आणि तेव्हाच माझ्या पोटात काही तरी झाल्याचं जाणवलं. मी विचारात पडले की मी असं काही पाहिलेलं नाही ज्यामुळे माझ्या पोटात काही तरी होतंय. त्यानंतर मला राहाची जाणीव झाली. तेव्हा पहिल्यांदा तिनं लाथ मारली होती. त्यानंतर तिनं पुन्हा किक करावं याची मी वाट पाहत होते. पण तिनं तसं काही केलं नाही. मग मी रणबीरला फोन केला. रणबीर तेव्हा मुंबईत होता आणि झोपत होता. त्यानं झोपेत विचारलं की काय झालं? तर मी सांगितलं की काही नाही! बाळानं लाथ मारली. तर तो म्हणाला, ओके! चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तो झोपायला गेला, पण मी रात्रभर झोपू शकले नाही. मला खूप जास्त आनंद झाला होता.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पहिल्यांदा आई बोलली राहा...

आलियानं राहा पहिल्यांदा मम्मा म्हणाली त्याविषयी सांगितलं. आलिया म्हणाली, 'मी आणि राहा एकटे होतो. आम्ही दोघे खेळत होतो आणि तेव्हाच राहानं पहिल्यांदा मम्मा हा शब्द उच्चारला. त्याआधी घरात भांडण होतं होतं की राहा पहिल्यांदा कोणता शब्द बोलणार मम्मा की पापा? रणबीर म्हणत होता की पापा आणि मी म्हणत होते की मम्मा. जेव्हा तिनं मम्मा म्हटलं तेव्हा घरी फक्त मी आणि राहा होतो. तिनं मम्मा म्हटलं, मी माझा फोन काढला आणि राहा पुन्हा मम्मा बोलण्याची प्रतीक्षा करू लागले. आधी तर ती मम बोलू लागली, पण नंतर तिनं मम्मा म्हटलं. तो व्हिडीओ माझ्याकडे अजूनही आहे.'