Mahesh Bhatt Birthday : पूजा भट्टला किस ते दोन लग्न... महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य कायम वादात, 'या' गोष्टीमुळे बदनाम

निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य बॉलिवूडमधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. यामध्ये त्यांच खासगी आयुष्य आणि अभिनेत्रींसोबतची जवळीक. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 20, 2024, 10:52 AM IST
Mahesh Bhatt Birthday : पूजा भट्टला किस ते दोन लग्न... महेश भट्ट यांचं खासगी आयुष्य कायम वादात, 'या' गोष्टीमुळे बदनाम title=

बॉलिवूडमधील लोकप्रिय फिल्ममेकर महेश भट्ट इंडस्ट्रीतील अतिशय बदनाम असे व्यक्तिमत्व आहे. अतिशय रंगीन व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. 20 सप्टेंबरला महेश भट्ट यांचा वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या करियरमध्ये बोल्ड कंटेटचे ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. या सिनेमांना लोकांनी आवडीने पसंत देखील केले आहेत. महेश भट्ट हे सक्सेसफुल फिल्म मेकर आहे.

15 वर्षांच्या मुलीला केलं किस 

1948 साली जन्मलेले महेश भट्ट 76 वर्षांचे झाले आहे. आजही त्यांचा एक फोटो चर्चेचा विषय आहे. पूजा भट्टसोबत लिपलॉक करणारा एक फोटो मॅगझिनमध्ये छापून आला होता. मॅगझिन 1990 मध्ये प्रसिद्ध झाली होती तेव्हा पजा अवघ्या 15 वर्षांची होती. एवढंच नव्हे तर महेश भट्ट यांनी म्हटलं होतं की, 'पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केलं आहे.' महेश भट्ट यांचं विधान आणि फोटो आजही चर्चेचा विषय आहे 

पत्नीला सोडून एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर 

महेश भट्ट यांनी पहिले लग्न ब्रिटिश तरुणी लॉरेन ब्राइटशी केले. लग्नानंतर त्यांनी पत्नीचे नाव किरण ठेवले. महेश भट्ट किरणसोबतच्या लग्नादरम्यान अभिनेत्री परवीन बाबीच्या प्रेमात पडले होते. एवढंच नव्हे तर त्यांचं हे विवाहबाह्य संबंध नातं उघडपणे सुरुच ठेवले.  एवढेच नाही तर ते पत्नी आणि मुलगी पूजा भट्टला सोडून परवीन बाबीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मात्र परवीनला स्मृतीभ्रंश झाल्याचे समजताच ते तिला सोडून पत्नीकडे परतले. यानंतर परवीन बाबी वेडी झाली आणि 2005 मध्ये तिचा मृत्यू झाला.

इस्लाम धर्म स्विकारून केलं दुसरं लग्न 

परवीन बाबीनंतर महेश भट्ट पुन्हा एकदा प्रेमात पडले. सोनी राजदानच्या प्रेमात पडले. दोघांची ओळख 'सारांश' दरम्यान झाली. सोनीला भेटल्यानंतर महेश भट्ट यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर लग्न करण्याची अट ठेवली. पण तसं मेहश भट्ट यांनी केलं नाही. इस्लाम धर्म स्विकारुन सोनी राजदानसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत आलिया आणि शाहीन भट्ट. 

रिया चक्रवर्तीशी जवळीक 

एवढंच नव्हे तर महेश भट्ट यांचे आपल्या अभिनेत्रींशी जवळचे संबंध असल्याचं समोर आलं. यामध्ये सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा देखील समावेश आहे. रिया आणि महेश भट्ट यांचे फोटो व्हायरल झाला. तेव्हा दोघांना खूप ट्रोल करण्यात आले. 

जिया खानसोबतचे फोटो 

दिवंगत अभिनेत्री जिया खानचा महेश भट्ट यांच्यासोबतचा कोजी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 2000 साली जिया खान महेश भट्ट यांचे गळ्यात गळे घातलेले फोटो समोर आले. जियाच्या नेल पॉलिशचं कौतुक करताना हा फोटो होता. तेव्हा त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले.