नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल.
सेहवाग म्हणाला, की मला गर्व आहे की भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून अनेक वर्ष राहिलो. सचिन, सौरव आणि द्रविड सारख्या खेळाडूंसोबत खेळल्याबद्दलही मला गर्व वाटतो.
I was scared of facing only one bowler,that was Muralitharan-Virender Sehwag to ANI #ThankyouSehwag
— ANI (@ANI_news) October 20, 2015
इंटरव्ह्यू देताना अत्यंत भावूक अंदाजात सहवागने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले, आपल्या नेहमी पाठिंबा दिला म्हणून मी तुमचा ऋणी असल्याचं तो म्हणाला. माझ्या वडिलांना माझ्यावर गर्व आहे, ते मला पाहत असतील. सेहवाग म्हटला त्याचा फंडा क्लिअर होता. मैदानातील प्रत्येक बॉलवर शॉर्ट मारायचा आणि स्कोअर बनवायचा.
My funda was to score on every ball and bowl a bit if I can: Virender Sehwag #ThankyouSehwag pic.twitter.com/rCmEgriomY
— ANI (@ANI_news) October 20, 2015
सहवागने मान्य केले की श्रीलंकेचा गोलंदाज मुरलीधरन याच्या चेंडूंचा सामना करताना भीती वाटायची. सहवागने म्हटले की गांगुलीने माझ्यासाठी ओपनिंग स्पॉटचा त्याग केला. त्याचा माझ्यावर खूप जीव होता आणि विश्वासही होता.
मी जेव्हा २८१ धावांचा आकडा पार केला तेव्हा व्हीहीएस लक्ष्मणने ड्रेसिंग रूममध्ये उभे राहून अभिवादन केले होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात आठवणीचा क्षण आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.