वीरेंद्र सेहवागच्या मुलाने बनविले एमएस धोनीचे स्केच, वीरू म्हणाला...

 वीरेंद्र सेहवागने आज एक ट्विट केले आहे, ते खूप ट्रेड करत आहे. वीरेंद्र सेहवागच्या मुलाने धोनीचे एक स्केच काढले आहे. याचा फोटो वीरेंद्र सेहवागने पोस्ट केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 25, 2017, 04:28 PM IST
 वीरेंद्र सेहवागच्या मुलाने बनविले एमएस धोनीचे स्केच, वीरू म्हणाला... title=

नवी दिल्ली :  वीरेंद्र सेहवागने आज एक ट्विट केले आहे, ते खूप ट्रेड करत आहे. वीरेंद्र सेहवागच्या मुलाने धोनीचे एक स्केच काढले आहे. याचा फोटो वीरेंद्र सेहवागने पोस्ट केला आहे. 

 

एमएस धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यातील वादाच्या बातम्या तुम्ही यापूर्वी वाचल्या असतील. अनेकवेळा म्हटले गेले की धोनीने सेहवागला अनेकवेळा टीममधून बाहेर ठेवले होते. त्याच्यामुळे वीरूचा संघात समावेश झाला नाही, शेवटी त्याने निवृत्ती घेतली. 

क्रिकेट सोडल्यानंतर सेहवाग सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. आपल्या फलंदाजीप्रमाणे तो ट्विट्सच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करत आहे. अनेकवेळा त्याचे ट्विट लोक डोक्यावर घेतात, तो आपल्या ट्विटच्या माध्यमातून तो खूप गहन गोष्ट करून जातो. 

धोनीने वन डे आणि टी-२० संघाचे कर्णधारापद सोडल्यानंतर सेहवागने अनेक ट्विट केले, त्यात त्यांनी प्रशंसा केली. त्यामुळे असे वाटले की दोघांमध्ये सर्व काही अलबेल झाले. याचे खरे कारण सेहवागचा मोठा मुलगा आहे. एक खेळाडू म्हणून सेहवागचा मोठा मुलगा धोनीचा फॅन आहे.